Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील माहूर मध्ये कृषी पंपाची चोरी; सदस्याच्या नातेवाईकांना अटक आरोपींनी चोरलेली मोटार शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार माहूर ग्रामपंचायत सदस्याच्या नातेवाईकाकडे आढळून आली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर न्यूज: माहूर (ता. पुरंदर) शेतकऱ्याचे विहिरीतील कृषी पंप चोरून, विक्री करणाऱ्या दोघाना सासवड पोलिसांनी अटक केली, या आरोपींनी चोरलेली मोटार शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार माहूर ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडून आढळून आली, या प्रकरणांनी गावकऱ्यांमध्ये संतापची लाट उसलली असून ,पोलीस तपास पुढे सुरू आहे, शेतकरी रोहिदास लक्ष्मण जगताप (वय 45) राहणार माहूर यांच्या शेतजमीनीतील गट क्रमांक 922 विहिरीतून 16 सप्टेंबर रोजी विद्युत पंपाची चोरी झाली, बाजरीच्या पिकाला पाणी घालण्यासाठी विहिरीवर गेल्यावर, पाईप कापलेले मोटर बांधलेला दोर, तोडलेला असल्याचे रोहिदास यांना आढळले, परिसराची तपासणी केली तरी कोणताही पुरावा मिळाला नाही. दरम्यान शुक्रवार दि. 3 ऑक्टोंबर रोहिदास हे कामाच्या निमित्ताने मांढर (ता. पुरंदर )येथील अजित गणपतराव शिर्के यांच्या घरी गेले तेथे त्यांच्या घरात चोरलेली मोटर पडलेली दिसली, शिर्के यांना मोटार बाबत विचारल्यावर संदीप लक्ष्मण चव्हाण वय 30 राहणार माहूर यांनी मला वापरण्यासाठी दिली असे ते म्हणाले, रोहिदास यांनी संदीप चव्हाण यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांना साहिल सोमनाथ खोमणे (वय 25) राहणार माहूर यांनी मला मोटर दिली असे सांगितले .या संगणमताने केलेल्या चोरीची खात्री पटल्यानंतर, रोहिदास यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल जाधव व संदीप पवार यांनी तात्काळ कारवाई करून संदीप चव्हाण वसाहिल खोमणे या दोघांना अटक केली.

Post a Comment

0 Comments