Hot Posts

6/recent/ticker-posts

गोविद्या गोसंवर्धन केंद्र आंबळेत भव्य गोदान समारंभ संपन्न;छत्रपती शिवेंद्रराजेंच्या हस्ते युवा शेतकऱ्यांना गोदान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हिंदू धर्मात गोदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. गोविद्या गोसंवर्धन केंद्र आंबळे करत असलेले गोसंवर्धनाचे कार्य खरोखरच आदर्शवत आहे," अशा गौरवोद्गारांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी गोविद्या गोसंवर्धन केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा अंतर्गत दि. २८ सप्टेंबर रोजी गोविद्या गोसंवर्धन केंद्र आंबळे येथे भव्य गोदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष व गोविद्या गोसंवर्धन केंद्र आंबळेचे प्रमुख विठ्ठल रामचंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात मा. छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते गावातील युवा शेतकऱ्यांना गोदान करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार विजयबापू शिवतारे, भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा सरचिटणीस संदीप (गंगारामदादा) जगदाळे, तालुका अध्यक्ष संदीप कटके, माजी अध्यक्ष गिरीष आप्पा जगताप, उपाध्यक्ष दिलीप आप्पा कटके,उद्योजक अॅड नितीन कुंजीर, ,हरिभाऊ लोळे, माजी सरपंच mangesh गायकवाड, 🤗 युवा मोर्चा प्रदेश सचिव अजिंक्यभैय्या टेकवडे, निलेश जगदाळे, विजय जगदाळे, समीर भिसे व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी गोविद्या गोसंवर्धन केंद्राचे कौतुक केले.फोटो : अंबळे ता. पुरंदर यथे गोदन करतांना मान्यवर

Post a Comment

0 Comments