Hot Posts

6/recent/ticker-posts

उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांचे कार्य कौतुकास्पद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी कामाचा सपाटा लावला आहे, पुरंदर तालुक्यात अनेक प्रकारचे प्रकल्प राबवताना प्रशासनाला सोबत घेत वाघिणीसारख्या काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे व उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी नुकताच विमानतळ संदर्भात सवॅ कारभार खुप अडचणीतून मागॅ काढुन शेतकरी महिला याच्याशी संवाद साधताना कुणालाही दुखावले नाही त्यामुळे कायॅ कौतुकास्पद उपजिल्हाधिकारी याचं आहेच. पुरंदर तालुक्यात आल्यानंतर त्या तालुक्यांची प्रशासकीय सेवा बजावत आहे, ती प्रशासकीय अधिकाऱ्यातील कर्तव्यदक्षता व जनसामान्य प्रति माणुसकी यांचा सुरेख मेळ घालणारी अशीच आहे, पुरंदर मध्ये आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे पूर्ण करणे, शासनाला माहिती पुरविणे, नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई वाटप करणे, अशी महत्त्वाची कामे त्यांनी केलेली आहेत, स्वतःच्या जीवाची परवा न करता, त्या प्रशासकीय सेवा बजावताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत, गावोगावी उद्भवणाऱ्या समस्या सोडवणे, शासनाच्या माध्यमातून सेवा देणे, इत्यादी कामे अतिशय नियोजन बद्दल रित्या पार पाडत आहेत, विमानतळा सारख्या प्रकल्प राबविताना त्यांच्या सेवेतील अनुभवाची शिदोरी खऱ्या अर्थाने कामाला येताना दिसत आहे. हे सर्व करताना त्यांच्या नेतृत्वाखानाची झलक पहावयास मिळते, अनेक गोष्टीत उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे वउपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली पुरंदर प्रशासन चांगले काम करत आहे, पुरंदर मध्ये प्रकल्प राबविताना आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नगरपालिका विभाग, आजी-माजी पदाधिकारी आदींचे सहकार्य त्यांना मिळत आहे, एक अधिकारी असून, पण सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्या तळमळीने काम करीत आहेत, प्रशासकीय सेवेतील कर्तव्य, अध्यक्ष, योद्धा म्हणून उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहेच.तसेच उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांचे सुध्दा कायॅ कौतुकास्पद आहे. यावेळी शेतकरी के. डी. मोरे डेक्कन मर्चंटचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली जनाबाई मोरे, गणेश काशिनाथ मोरे, सरपंच मंजुषा गायकवाड, देविदास कामठेनिरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक, संदीप लोळे, प्रदीप कामठे, सौरभ कुंभारकर, धनंजय कामठे, विनोद मोरे, राजाभाऊ मोरे, रोहित मोरे, काका मोरे, पत्रकार बापू मुळीक, पत्रकार ए.टी. माने, मोरे वस्तीवरील बहुतेक भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी यावेळी उपस्थित होते. कुंभारवळण गावातील स्टॅन्ड पासून ते वनपुरी पर्यंत 254 घरे असून, गावची शेती हा मुख्य व्यवसाय असून, 94% बागायती क्षेत्र असून, आम्हाला भाजीपाला, यासाठी पेरू, सिताफळ, अंजीर, डाळिंब यासाठी नजदीक बाजारपेठ असल्यामुळे, सात गावातील क्षेत्रापेक्षा कुंभारवळण गाव 94 टक्के बागायत क्षेत्र आहे, तर यावर आम्ही सर्व शेतकरी विमानतळ साठी संमती फक्त जमीन मोजणीसाठी दिली आहे, तर विमानतळाला संमती आमची कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांनी दिलेली नाही. गणेश काशिनाथ मोरे शेतकरी कुंभार वळण. कुंभारवळण गावचे आज जमीन मोजणीची स्थिती चालू असताना, सर्वसामान्य शेतकरी, महिला यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, या गावातील सर्व क्षेत्र पाहिले असता, सात गावातील क्षेत्रपेक्षा सर्वात जास्त क्षेत्र कुंभारवळण गावचे बागायत क्षेत्र आहे, चिकूच्या बाग हा 40 वर्षापासून स्वत: जनाबाई मोरे रुजवत आहेत, तर त्यावर त्यांनी दोन मुलींची लग्न केलेली आहेत, तर दोन मुले सुद्धा विमानतळाच्या स्थितीमुळे भयभीत झाली असून, यासाठी शासनापर्यंत कुंभारवळणीची बाजू जमीन मोजणी झाल्यानंतर, मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी या पर्यंत अहवाल नक्की पोहोचवु असे मोरे वस्तीवरील शेतकऱ्यांना आश्वासित स्वत: उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे. वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर.

Post a Comment

0 Comments