Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेला सलग ३ वर्षे डॉ.न.म.जोशी मराठी भाषा संवर्धन पुरस्कार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाचन व लेखन संस्कृती वाढीला लागण्याची गरज आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचावर हे संस्कार करणे गरजेचे आहे. राज्य ग्रंथालय विभाग व माध्यमिक विद्यालय यांनी एकत्रित येऊन लेखन व वाचन चळवळ वाढविणे गरजेचे आहे. असे विचार महाराष्ट्र राज्य कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी प्रथमा व प्रवेश परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थी बसविल्याबद्दल सलग तीन वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखेला डॉ.न.म. जोशी मराठी भाषा संवर्धन पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील व सुरेश देशपांडे यांनी कोलते यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात राज्य ग्रंथालय परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे यांच्या हस्ते कोलते यांचा सत्कार करण्यात आला. पुरंदर तालुका ग्रंथालय संघ व महाराष्ट्र साहित्य परिषद,सासवड शाखा यांच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सासवड शाखेचे सहकार्यवाह प्रा.संदीप टिळेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह संतोष काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ॲड.दिलीप निरगुडे, बंडू काका जगताप, बाळासो मुळीक, ॲड.कलाताई फडतरे, प्रा.केशवराव काकडे, धनाजी नागणे, संतोष कोलते, डॉ. राजेश दळवी, तानाजी सातव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्जेराव मोहिते (खेड), डॉ. कुमुदिनी बोराडे (शिरूर), गौरव कोलते,डॉ.जगदीश शेवते, ॲड.अशपाक बागवान, वसंतराव ताकवले, कुंडलिक मेमाणे, विद्या जाधव, अरुण कोलते, विकास कोलते, नितीन लवांडे, बबन तावरे, संजय राऊत, सुनील लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments