पुरंदर तालुक्यातील पंचायत राज निवडणुकीमध्ये खरा ओबीसी चालवा; मल्हार गड दसरा मेळाव्यामध्ये प्रा. लक्ष्मण हाके यांचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्यूज: पंचायत राज निवडणुकीमध्ये धनगर, माळी आणि सर्वच अठरापगड समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन, ऐकायची तळी उचलून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरा ओबीसी चालवा असे आवाहन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी जेजुरी येथे केले. जेजुरी येथे नवनाथ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार गड दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके बोलत होते. प्रा. हाके मनाले की, ओबीसी 70 ते 80 टक्के आहेत, एकत्रित आलो तर काय होईल असा सवाल त्यांनी त्यावेळी केला. यावेळी शिवानंद हैबतपुरे महाराज यांनी बहुजनांच्या एकत्रीकरणाचे मल्हार गड मेळावा हे केंद्र आहे, जाती वेगवेगळ्या मात्र वेदना एक आहे, न्यूनगंडाने पछाडलेल्या समाजाने एकत्रित येणे गरजेचे असून, प्रस्थापितांचा कर्दनकाळ ओबीसी आहेत, असे विचार त्यांनी व्यक्त केले. एडवोकेट मंगेश ससाणे यांनी मराठवाड्यात 10 तोंडी रावण असून, त्यातील एकच तोंड बोलतोय त्याच्यामागे कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असेही त्यांनी सांगितले. मल्हार गड दसरा मेळाव्याचे आयोजक नवनाथ पडळकर यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून दुसरा जिल्हा केला जात आहे, खंडेरायाच्या या भूमीला मल्हार गड अथवा मल्हार नगर जिल्हा असे नाव द्यावे, जेजुरी येथील होळकर शाहीतील वास्तु, मंदिरे, यांचे जतन करून, अतिक्रमणे काढावीत ओबीसी धनगर व सर्व बहुजन समाजाने आपल्या आरक्षणासाठी एकत्रित येऊन लढा तीव्र करावा, अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांनी जोरदार केलेल्या देशातील सर्व वास्तु व मंदिराचे जतन केंद्र व राज्य सरकारने करावे, बहुजन समाजातील व्यक्तीवर हल्ले होत आहे त्याचे रक्षण करण्यासाठी सर्व समाजाचे एकत्रित संघटन करावे असे ठराव या मेळाव्यात मांडले .याला एकमताने मंजुरी देण्यात आली. राजेंद्र बरकडे, शिवराज झगडे यांनी सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक आयोजक नवनाथ पडळकर यांनी केले, सूत्रसंचालन स्वप्निल बरकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र बरकडे यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments