पुरंदर तालुक्यातील दिपावली निमित्त शोभेची दारू व फटाके विक्री बाबत शासनाचे नियम जाहीर उपविभागीय दंडाधिकारी यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आगामी दिपावली उत्साह निमित्त सन 2025 साली पुरंदर उपविभागात सेवेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी पुरंदर उपविभाग यांचे कार्यालयाकडून देणार आहेत, अशी माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दि. 17 ऑक्टोंबर 2025 पूर्वी साध्या कागदावर दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प, तिकीट लावून अर्ज करावा लागणार आहे, या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहेत, ज्या जागेत शोभेची दारू व फटाके विक्रीचा व्यवसाय करा वयाचा आहे, त्या जागेचा मिळकत रजिस्टर चा उतारा किंवा ही जागा दुसऱ्याच्या मालकीची असेल तर, त्यांचे नाव असलेल्या मिळकतीचा उतारा व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर सहमती पत्र पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ,उपनिरीक्षक यांचा शोभेची दारू व फटाके साठा व विक्री करण्याचा सुरक्षितता बाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा तसेच याबाबत प्रमाणपत्र व व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील दुकानबाबत नगरपालिकेचे दुकानासाठी जागा दिलेल्या पत्राची प्रत मागील वर्षाच्या परवानगीची झेरॉक्स प्रत ,या अर्जासोबत फटाका विक्री परवाना फी रुपये 600 भारतीय स्टेट बँक सासवड येथे चलनाद्वारे भरावी व चलन अर्जासोबत जोडावे, शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत 17 ऑक्टोबर 2025 पासून 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत राहणार आहे, असेही कळविले आहे याबरोबरच शोभेची दारू व फटाके विक्री जागा राहत्या घरापासून लांब असल्याची खात्री करावी, अशी सूचना मुख्याधिकारी सासवड व जेजुरी यांना करण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments