सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये संस्काराचा एक प्रकारचा पायडा चांगल्या प्रकारे ठेवा जपावा: सतिश उरसळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, विद्यार्थी संस्कारक्षम होणे काळाची ही सध्या गरज आहे ,म्हणून विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून, अध्यापन कार्य करावे, असे मत पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतामध्ये सतीश उरसळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे होते. याप्रसंगी तालुक्यातील चार मुख्याध्यापक, 10 शिक्षक व चार शिक्षकेतर कर्मचारी यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव चिन्ह ,प्रमाणपत्र, संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अध्यापन तंत्रात बदल केला पाहिज, असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी केले. महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी शिक्षकाला शासन स्तरावर मानाचे स्थान मिळणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, गुरुकुल करिअर अकॅडमी सासवडचे प्राचार्य संदीप टिळेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश उरसळ या मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सागर चव्हाण ,आबा वाघमारे आणि महेश तांबे या शिक्षकांनी पुरस्कार त्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड येथील सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला सेकंडरी स्कूल एम्प्लॉयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा आयडीएफ संघटनेचे सचिव तानाजी झेंडे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभू पेटकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सह वार्ता संपादक विनायक सुबे, सासवडचे माजी नगराध्यक्ष दत्ता नाना जगताप, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुरंदर तालुका अध्यक्ष शिवहर लहाने ,पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष संजय धुमाळ, दिलीप पापल, प्रल्हाद कारकर, किशोर दरेकर, दिपक भोसले, अशोक बाणे, सिद्राम कांबळे, कीर्ती कुमार मेमाणे आदी मान्यवराचा तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती झगडे शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय रोकडे सचिव सचिन घनवट तालुका टीडीएफ चे अध्यक्ष जालिंदर घाटे, सचिव रमेश बोरावके, माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्ष वर्षा देसाई, सचिव मोहिनी लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप नेवसे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत व आभार माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय रोकडे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सचिन घनवट यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments