पुणे जिल्हा हातपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नारायण सावंत तर कार्याध्यक्षपदी कैलास सुर्वे यांची एकमताने बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाशी सलग्न असलेल्या पुणे जिल्ह्यातील हातपंप देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी (मेळ ता. बारामती) येथील नारायण तुकाराम सावंत यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष पदावर (शिद ता. भोर )येथील कैलास जगन्नाथ सुर्वे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली असल्याची, माहिती पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड ज्ञानोबा गोणे यांनी सांगितले. याबाबतचे अधिक माहिती देताना कॉमेड ज्ञानोबा गोणे यांनी सासवड येथील हातपंप व दुरुस्ती देखभाल करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात विशाल चंद्रकांत काळे (इंदापूर) यांची उपाध्यक्ष पदावर दिनेश लक्ष्मण पवार (खेड) यांची सचिव पदावर अनिकेत पवार (दौंड) यांची सहसचिव पदावर विशाल मनीनाथ शेवाळे (शिरूर) यांची सरचिटणीस पदावर महादेव लक्ष्मण जाधव (इंदापूर )यांची कोषाध्यक्ष पदावर मनोज राम कांबळे (वेल्हा )यांची प्रसिद्धी प्रमुख यांचीही सदर संघटनेच्या पदावर एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सांगितले. या मेळाव्यात भोर, वेल्हा ,पुरंदर ,बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, खेड ,मुळशी, हवेली व इतर तालुक्यातील हातपंप कर्मचारी उपस्थित होते. त्या निवड प्रसंगी सासवड नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मोहन चव्हाण, ज्ञानेश्वर गिरमे, प्रवीण जगताप, किरण हेंद्रे, बबन जगताप ,हे देखील उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देऊन संघटनेमुळे व संघटनेच्या एकजुटीमुळे आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून घेतले आहेत. हातपंप कामगारांनी ही आपली संघटना मजबूत करून आपले प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन कॉम्रेड ज्ञानोबा घोणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले ,नवनियुक्त अध्यक्ष नारायण सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व पदाधिकारी यांची एक मताने व बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच हातपंप देखभाल व दुरुस्ती विभागातील कर्मचारी यांच्या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी मी व माझे कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी एक प्रकारची ग्वाई दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments