Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पामध्ये गैरव्यवहार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपुर, मुजवडी, खानवडी व पारगाव या विमानतळ प्रकल्पग्रस्त या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहारांमध्ये बोगस नोंदी झाल्याचे उघड झाले आहे, दलाल, वकील, अकाही अधिकाऱ्यांनी बनावट दस्त, आधार कार्ड व सह्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, लाखो रुपये गैरमार्गाने मिळवलेले आहेत. खानवडी आणि वाघापूर येथील काही व्यवहारांमध्ये निवृत्त अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत, वनपुरीतील काही जमिनीच्या बनावट दस्तऐवजी प्रकरणी पुणे येथील प्रियाली परदेशी यांनी सासवड पोलीसाकडे एक प्रकारची तक्रार दिली आहे, या प्रकारामध्ये दलालांची मोठी टोळी तहसील, प्रांत आणि निबंधक कार्यालयात सक्रिय असल्याचा आरोप असून, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जास्त पैसे घेऊन, कागदपत्रे पुरवल्याचे समोर आले आहे. दोशीवर कठोर कारवाई करण्यासाठी पुरंदर तालुका भाजप अध्यक्ष निलेश जगताप यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments