Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये खुला गटामुळे चुरस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद खुला या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे, मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती( एससी) राखीव होते, त्यावेळी 9 प्रभागातून 19 सदस्य पैकी 15 सदस्य आणि नगराध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या जनमत विकास आघाडीचे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन- दोन सदस्य निवडून आले होते, आता सर्वसाधारणचा मार्ग मोकळा झाला आहे. आता 11 प्रभागातून 22 सदस्य आणि जनतेतून नगराध्यक्ष यासाठी निवडणूक होणार आहे. सासवड नगर परिषदेवर गेली दोन पंचवार्षिक जनमत विकास आघाडीची एक हाती सत्ता होती, या आघाडीचे नेते आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी( दि. 5) रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह बैठक घेऊन, आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सासवडच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असल्यामुळे सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या राजकीय आघाड्या आणि घडामोडी घडतात, मूळ घटक पक्ष एकत्र येतात की, स्वतंत्रपणे लढतात हे पाहणे अचूकतेचे ठरणार आहे, नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने, निवडणुकीतील चुरस वाढणार असून, राजकीय समीकरणे कशी जुळतात ,याकडे लक्ष लागले आहे, तर पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी नगर परिषदेमध्ये खरी लढत ही भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात होणार आहे यासाठी पुरंदर हवेलीचे सवॅसामान्य नागरिकांच्यात सध्या तरी कुजबूज सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments