Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये बोगस दस्त नोंदणीची करणारी टोळी अधिकतम सक्रिय सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यांमध्ये सध्या नव्याने होऊ घातलेले विमानतळ आणि आयटी पार्क यामुळे येथील जमिनी सोन्याचा भावामध्ये त्याचा भाव झालेला आहे, त्यामुळे जमिनीचे फार मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत चाललेले आहेत, याच पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये बोगस दस्तऐवज बनवणाऱ्या काही टोळ्यांचा सक्रिय होत असल्याची दिसून येत आहे. अनेक वर्ष अशा प्रकारच्या अनेक पडीक जमिनी पाहून, त्या ठिकाणी मालक असल्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड बनावट बनवायचे असून, दुसऱ्याला ती जमीन विक्री करायची, काही जमिनीचे मालक मृत असून, त्यांची वारस नोंदी झालेल्या नाहीत, त्यांच्या नावावर खोटी वारस नोंद करून, ती जमीन विक्री केली जात आहे, अशा प्रकारच्या अनेक प्रकार सध्या पुरंदर तालुक्यामध्ये उघडकीस येत आहेत. सासवड पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी दाखल होत असताना, बोगस खरेदी खतामध्ये शैलेश कोतमिरे, प्रियाली परदेशी, भुतडा, पल्लवी सोनवणे अशा बऱ्याच प्रकारची बोगस खरेदीखत झाल्याच्या तक्रारी दाखल झालेली असून, यातील फिर्यादी दाखल झालेल्या बोटावर मोजण्या इतक्याच घटना घडलेल्या आहेत, बोगस चाललेले दस्त हे सर्वर डाऊन, झाल्यानंतर पाच वाजेच्या पुढचे का होतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या कारभारावर तर प्रश्नचिन्हच उपस्थित केले जात आहे. या दस्ता मध्ये असणारे आधार कार्ड पॅन कार्ड यावरील थंब व प्रत्यक्षात उभा राहिलेली व्यक्ती हे ते आहेत की नाही, हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची असते, तरीही बोगस नोंदणीचे प्रकार वाढत चाललेले आहेत त्यातून, बोगसदस्त करणारी टोळी व दुय्यम निबंधक अधिकारी यांचे सुत जुळलेची सध्या तरी कुजबूज सुरू आहे. प्रियाली परदेशी यांनी केलेल्या अर्जा नुसार आजपर्यंत तक्रार दाखल होणे अपेक्षित होते, परंतु आर्थिक हित संबंधापोटी व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप त्यांचा आहे ,त्यातून बोगस दस्त करणारी टोळी ही एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याचेही बोलले जात आहे. मांडकी येथील सुद्धा दस्तऐवज असा चुकीचा प्रकारचा करून घेणारे एजंट किरण भांडवलकर यांनी जाधव कुटुंबीयांकडून सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडवून आणलेली आहे. ही घटना सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून, सुद्धा त्यावर आरोपी कसल्याही प्रकारची दाद देत नाही असा गंभीर आरोपही जाधव कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments