पुरंदर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आला आहे, माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ/ जिपपंस- 2025/ प्र. क्र. 30/ का. 7, दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 नुसार पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात येणार आहे, या अनुषंगाने पंचायत समिती पुरंदर यांच्या सभागृहामध्ये दि. 13 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम पारदर्शक सुयोग्य व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, तालुक्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी व प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे, तहसीलदार विक्रम राजपूत (पुरंदर )यांनी आवाहन केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments