पुरंदर तालुक्यातील सोनोरी करांचे उपोषण रस्ता, विजेसाठी चाललेली उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित;तर सासवड सोनोरी रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती करण्याचे दिले पत्र सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सोनोरी (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थ सासवड सोनेरी रस्ता, सासवड नगर परिषदेच्या हद्दीतील रस्ता आणि विजेच्या समस्याबाबत शुक्रवारी (दि. 3) पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर महावितरण सासवड, नगरपरिषद व बांधकाम उपविभाग ,पंचायत समिती यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले, यावेळी भारत मोरे, नितीन काळे, बाळासो काळे, दिपक झेंडे, नंदकुमार काळे, अक्षय कामठे, लक्ष्मण पवार, निवृत्ती गावडे, बबन काळे ,तुकाराम झेंडे, किसन काळे, पिंटू काळे, श्रीधर शिंदे, सतीश शिंदे, शिवाजी सुळके, वसंत काळे, दत्ता काळे, सुभाष काळे, संदीप काळे, रामभाऊ काळे, बळीराम सोनवणे, संतोष काळे, दिलीप काळे ,जालिंदर काळे, विलास काळे ,संजय काळे, अनिल काळे, अजय काळे, कुमार काळे, संजय काळे,तुळशीराम काळे, पिंटू काळे, जालिंदर काळे आधी उपोषणास बसले होते. सासवड ते सोनोरी रस्त्यावरील खड्ड्यामुळे गावातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार व दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती, अनेक दुचाकी स्वरांचा अपघात होऊन, दुखापत झाली आहे .शेतकऱ्यांना शेतीमालाचे नेताना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी रोज छोटे-मोठे अपघात तर घडत आहेतच, वारंवार अर्ज निवेदने व पत्रव्यवहार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे ,असा आरोप नागरिकांनी केलेला आहे. सासवड सोनेरी रस्ता व सोनोरी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आठ दिवसात कार्यवाही करण्यात येईल, नगरपालिका हद्दीतील कचरा, समस्या व सांडपाणी त्वरित बंद करण्यात येईल, व सासवड हद्दीतील रस्ता आठ दिवसात दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे पत्र नगरपालिका अधिकारी यांनी दिले. महावितरण यांनी सुध्दा पत्र दिले. अशी माहिती भारत मोरे यांनी दिली. यावेळी पंचायत समिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय गिते, संतोष नलावडे ,सासवड नगरपालिका बांधकाम विभागाचे जावेद मुल्ला, पोलीस स्टेशनचे गुप्त विभागाचे हवालदार रुपेश भगत, महावितरण कनिष्ठ अभियंता प्रकाश ढेरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन, समस्या बाबत कार्यवाही करण्याची पत्र दिल्याने, ग्रामस्थांनीही उपोषण सोडण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments