Hot Posts

6/recent/ticker-posts

संस्थाचालक शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संस्थाचालक शिक्षण मंडळ , पुणे जिल्हा या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक (सन २०२५ ते २०२८) नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध करण्यात आली. २०२१ साली नोंदणी केलेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर असे आहे. पुणे जिल्हा व शहरातील सुमारे २०० शिक्षण संस्था सभासद झालेल्या आहेत. या संस्थेमार्फत नवीन शिक्षक भरती बरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - विजय कोलते, अनिल मेहेर, ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील,प्रमिला गायकवाड, प्रदीप वळसे पाटील, महेश ढमढेरे, संग्राम कोंडे देशमुख, संग्राम मोहोळ, गणपत बालवडकर, प्रसन्नकुमार देशमुख, वीरसिंह रणसिंग, महादेव कांचन, संदीप कदम, जयश्री पलांडे, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण भोसले, अजित वडगावकर, डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ.नंदकुमार निकम , नंदकुमार शेलार यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. सदरची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी संस्थाचालक शिक्षण मंडळ , पुणे जिल्हा संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते ,उपाध्यक्ष अनिल मेहेर ,प्रदीप वळसे पाटील, आप्पासाहेब बालवडकर, महेश ढमढेरे यांनी प्रयत्न केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वि. ल.पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हनुमंत काळे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments