पुरंदर तालुक्यातील पिसे ग्रामपंचायत मधील विद्यमान सरपंच व ग्रामसेविका यांचा आताच्या वर्षभरातील कारभार गैरवर्तणूकीचा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पिसे (ता. पुरंदर) येथील ब्राह्मण तलाव यातील उन्हाळ्यामध्ये गाळ काढण्याचे काम सेंट्री ट्रस्ट यांच्यामार्फत करण्यात आले, त्यावेळी गावच्या वतीने तेथील असणारे शेतकरी, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, यांना सहमतीत न घेता, फक्त सरपंच व ग्रामसेविका यांच्या मदतीने गाळ काढण्याचे जे काही काम करण्यात आले, तर त्यावेळी सेंट्रि ट्रस्ट कंपनीतील असणाऱ्या कामगारासाठी नाष्टा, दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण हे सर्व कामगार 15 ते 20 असताना, यांची जबाबदारी सरपंच व ग्रामसेविकेने गावातील सामाजिक कार्यकर्ते, संतोष राजाराम मुळीक यांना दिली होती, त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली, परंतु यातील ऍडव्हान्स ग्राम पंचायतीने संतोष राजाराम मुळीक यांना दहा हजार रुपयांचा चेक ॲडव्हान्स म्हणून दिला आहे, तर आत्तापर्यंत मोजक्याच शेतकऱ्यांनी, मदत करून, रक्कम जमा केली आहे, तर तलावातील विहीर काही शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून, काही शेतकरी यांच्या स्व: मालकीच्या नाहीत, यातील गाळ, माती, मुरूम हा आपल्या शेतात भरून घेतला आहे, विकला सुद्धा मुरूम आहे, तलावाच्या खाली विहिरी सुद्धा काही स्व: मालकीच्या तर काही अनाधीकृतरित्या असून, तसेच बंगल्याचे हे सुद्धा अनाधिकृत असून, त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने ही कारवाई त्वरित करावी, तसेच यांना जे जेवण पुरवणारे सामान्य शेतकऱ्यांचे बिल बासष्ट हजार रुपये रक्कम ग्रामपंचायत सात ते नऊ महिने झाले सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम मुळीक यांना मिळत नाही, त्याबद्दल विषय गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच,शेतकरी, ग्रामसेविकेवर व सरपंचावर दबाव आणत आहेत, स्पष्टपणे चार ते पाच जण सांगतात की, बिल द्यायचे नाही,यावर विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांनी सांगून सुद्धा ग्रामसेविकेने बिल देण्याची त्यांची मानसिकता होत नाही, ग्रामसेविका व सरपंच हे गावातील चार ते पाच व्यक्तींचे ऐकत आहेत, तर 62 हजार रुपये जेवणाचे डबे पुरवलेले संतोष मुळीक यांचे बिल बुडवायचे आहे, याला चार ते पाच जण जबाबदार आहेत, आजी, माजी सरपंच, माजी उपसरपंच, काही शेतकरी ,जबाबदार आहेत, यास पिसे बीट अंमलदार पोलीस,सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करत आहेत, तर या प्रकरणात पुरावा दहा हजार रुपयांचा मिळालेला आहे हा मग चेक कसा काय दिला? याचा प्रश्न खुद्द ग्रामसेविका व सरपंच यांनी याबद्दल उत्तर द्यावे मग बाकी राहिलेले 62 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी एवढे सात ते नऊ महिने वेळ कशासाठी घालवला? सरपंच व ग्रामसेविकेने जबाबदारी घेतली आहे ना, तर मग त्यांना 62 हजार रुपये बिल देण्यासाठी एवढी वेळ का? लागत आहे, निस्त्या टिवल्या, बावल्या ग्रामसेविका मारत आहे ,तर सरपंच सुद्धा यावर काही ठिकाणी कुठली ठोस भूमिका देत नाहीत, जे अडथळे आत्तापर्यंत निर्माण झालेले आहेत ते फक्त सरपंच व ग्रामसेविका व काही शेतकरी पिसे येथील यांच्यामुळे 62 हजार रुपयांचे बिल अद्याप पर्यंत मिळालेले नाही, त्यामुळे ग्रामसेविका, सरपंच, बीट अंमलदार, व गावातील पाच शेतकरी यांच्यावर कडक कारवाई करून, प्रशासकीय सेवेमधील अधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई त्वरित करावी ,अशी मागणी स्पष्टपणे हरिभक्त परायण महाराज संतोष राजाराम मुळीक यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments