पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील गुरुकुल करियर अकाडमी मध्ये तालुकास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा शनिवारी दि. 4 रोजी पार पडणार आहे. पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांच्या वतीने आयोजन केले आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ, तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 18 शिक्षकांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन, गौरविण्यात येणार असल्याची माहिती पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय रोकडे यांनी दिली. पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे लता बोकड (वनपुरी) दादासो साठे (दिवे) सतीश निगडे (वाल्हे) विजयकुमार हाके (सासवड) रामदास वाघ (माळशिरस) आबा वाघमारे (नायगाव) सविता गिरी (निरा )प्रमिला मेमाणे (परिंचे )शमिका गारडे (बोपगाव) महेश तांबे (जेजुरी) सागर चव्हाण (जेजुरी )माधव गाडेकर (गुरोळी )मनोज कुमार भागवत (रिसे )शंकर सुतार (मांडकी) सतीश जुन्नरकर (गुलुचेे) प्रकाश हांडे (खळद) हनुमंत कारके (सासवड) संजय पवार (नीरा).
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments