Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील फार्मा मॉडेल मध्ये श्रुती हर्षदाची बाजी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड आणि केमिस्ट असोसिएशन पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने, फार्मासिस्ट दिनानिमित्त राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मॅनिया स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेमध्ये एस जी आर एस कॉलेज ऑफ फार्मसी च्या श्रुती बेबडे व हर्षदा केवढे यांनी प्रथम सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी पुणेच्या सेकडरीला हिने द्वितीय तर पी एस मॉर्डन कॉलेज ऑफ फार्मसी निगडीच्या मृण्मयी कोठे ,तन्मय जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला या स्पर्धेचे उद्घाटन आणि मूल्यमापन करण्यासाठी डॉ. संजीव दिगंबर टाकसाळे, संचालक पियुष ड्युटी फार्मा ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड तसेच पलक अगरवाल बायो प्रोसेस डिव्हिजन एन्जॉय बायोटेक पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेलचे परीक्षण केले. कार्यक्रमाला बाळासो भिंताडे कार्यकारणी सदस्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पुरंदर यांनी उपस्थिती लावली. हा उपक्रम प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरिते पार पडला. समन्वयांची जबाबदारी डॉ. वैभव शिळीमकर, प्राध्यापक हनुमंत पाटील ,तसेच पॉलिटेक्निकल विभागातील प्राध्यापक सागर भिसे यांनी सांभाळली.

Post a Comment

0 Comments