Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामधील सासवड या ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शहरातील सोपान नगर परिसरात दोन दिवसात चोरीच्या दोन घटना घडल्याने, नागरिका मध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी दि. 29 रात्री सीसीटीव्ही कॅमेरा मुळे लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये चोरट्यांचा चोरीचा मोठा प्रयत्न फसला असून, मंगळवारी दि. 30 सकाळी याच परिसरात असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीतही घरफोडीचा प्रकार उघडकीस आला, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोपानगर येथील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये सोमवारी मध्ये रात्री अडीचच्या सुमारांमध्ये पाच चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचा खर्च टाळून, बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मुळे हा चोरीचा प्रयत्न अयशश्वी ठरला, रात्री देवदर्शन करून परत येणाऱ्या ऋषिकेश पवार यांना त्यांच्या मोबाईलवरील सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्यांची चाहूल लागली, त्यांनी तात्काळ सोसायटीतील इतर रहिवाशांना याची माहिती दिली. नागरिकांची धावपळ पाहून, चोरट्यांनी जवळच्या शेतातून पळ काढला, यादरम्यान मंगळवारी दि. 30 सकाळी याच परिसरामध्ये सिद्धिविनायक सोसायटीमध्ये सुप्रिया बागवान यांच्या बंद घराचे कुलूप तोडून, चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना ही उघडकीस आली चोरट्यांनी घरातील सर्व कपाटे उघडली मात्र, त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू मिळाली नाही. सलग दोन दिवस झालेल्या घटना मुळे परिसरामध्ये नागरिकांच्या चिंतेचे वातावरण आहे. या दोन्ही घटनाानंतर सासवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, पाहणी केली आहे. चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिकांनी पोलिसांना या भागांमध्ये रात्रीची ग्रस्त वाढवण्याची एक प्रकारे सासवड नाही तर पुरंदर तालुक्यामध्ये मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments