वाघिरे महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड वाघिरे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉफ वेल्फेअर कमिटी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या व्याख्यानासाठी जेजुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार तज्ञ गिरीश झगडे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. झगडे यांनी विद्यार्थ्यांना तसेच कर्मचारी वर्गाला माहितीचा अधिकार कायदा, त्याचे महत्त्व, उपयोग व पारदर्शक शासनप्रणालीसाठी असलेले योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी पाहुण्यांचा सत्कार करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, IQAC समन्वयक प्रा. बी. एल. शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे, प्रा. समीर कुंभारकर तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments