हिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप लिंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कुदळे सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हिवरे( ता. पुरंदर ) येथे हिवरे विविध कार्यकाऱी सोसायटीचे चेअरमन दिलीप हिवरेकर, वामन गायकवाड यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागी निवडणूक होऊन यात हिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप मधुकर लिंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी संगीता रामचंद्र कुदळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पुरंदरच्या सहाय्यक निबंधक डॉ. यशवंती मेश्राम यांनी केली. यावेळी सोसायटीचे संचालक एम. के. गायकवाड, शब्बीरभाई शेख, दिलीप हिवरेकर, वामन गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष दळवी, गणपत भडाळे, बाजीराव गायकवाड, कानिफनाथ दळवी, गुलाब गायकवाड, संतोष गायकवाड, शंकर दळवी व निलेश दळवी, पासवर्ड नगरपालिकेचे माजीउपनगराध्यक्ष विजय वढणे, माजी नगरसेवक संदीप राऊत, गणेश मोरे, नवनाथ बोरावके, दत्ता राऊत, सचिन पठारे, सुशांत भांडवलकर आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments