Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी शिक्षण सेवक पतसंस्था आदर्श : माजी आमदार संजय जगताप यांचे गौरवोद्गार.... २५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संस्थापक स्व. चंदूकाका जगताप यांच्या विचार आणि आर्थिक शिस्तीप्रमाणे या पतसंस्थेचे कामकाज राज्यातील सेवक संस्थेत आदर्श व अग्रगण्य आहे, यापुढेही राहील असे गौरवोद्गार काढत माजी आमदार संजय जगताप यांनी, संस्थेच्या सर्व शाळांतही शिस्त, समाजात नावलौकिक असून चांगले विद्यार्थी घडवावेत असा आशावाद व्यक्त केला. सासवड (ता.पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसरक मंडळ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( ता. २८) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संपन्न झाली. माजी आमदार व शिक्षण संस्थेचे सचिव संजय जगताप यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक स्व चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचेपूजन, दिपप्रज्वलन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तसेच सभासदांच्या पाल्यांचे सत्कार करण्यात आले. मानद सचिव हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक, अहवाल वाचन केले. अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी, ३१ मार्च २०२५ अखेर भागभांडवल ३ कोटी १६ लाख, ठेवी २ कोटी ११ लाख, कर्जवाटप ६ कोटी ८ लाख असून, २८ लाख ६२ हजार रुपयांचा नफा, सभासद संख्या २४४, स्वनिधी ६४ लाख ८३ हजार, अधिकृत भागभांडवल १० कोटी, आॅडीट वर्ग 'अ' असून इतर बँकां व पतसंस्थांमधील गुंतवणूक २१ लाख २७ हजार रुपये असल्याचे सांगितले. रविंद्रपंत जगताप, कानिफनाथ आमराळे, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सहसचिव मोहन निगडे, संचालक विठ्ठल कदम, प्रिया गायकवाड, पांडुरंग दुर्गाडे, शहाजी जाधव, राजेंद्र जाधव, विद्या कारंडे, जीवन कड, नितीन काकडे, सल्लागार उत्तम निगडे, नंदकुमार बारवकर, विजय काकडे, शिवाजी कोलते, हरीभाऊ टापरे, लक्ष्मण गोळे, शांताराम राणे, मारूती झगडे, गायत्री बेलसरे, विजयकुमार हाके, विलास गंगनमले, व्यवस्थापिका श्रद्धा इभाड आदी उपस्थित होते. संचालक रमेश बोरावके यांनी सुत्रसंचलन केले तर रामदास जगताप यांनी आभार मानले. फोटोओळ :- सासवड (ता.पुरंदर) : दिपप्रज्वलन करताना संजय जगताप, राजवर्धिनी जगताप, नंदकुमार सागर व संचालक मंडळ.

Post a Comment

0 Comments