Hot Posts

6/recent/ticker-posts

युवा आमदार सत्यजित तांबे यांचा वाढदिवस सासवडमध्ये उत्साहात साजरा​गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप​ सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समाजातील गरजूंना मदत करण्याची शिकवण देणारे युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुर्यवंशी आणि युवा नेते संभाजीराजे जगताप मित्र परिवाराच्या वतीने पुरंदर शैक्षणिक संकुलातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पुरंदर शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमात राजेंद्र गुरव, स्वप्निल इभाड, विकास मोरे, नाना शेंडकर, दादासो जगताप, अमोल दिवसे, अक्षय शेळके, राहुल धुमाळ, अजित काकडे, सतीश गायकवाड, दीपक जावळे, अमोल दिघे, कैलास भिंताडे, आर्यन सुर्यवंशी आणि आदित्य सुर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.​ हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा सोहळा नसून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.​चौकट..... या उपक्रमाविषयी बोलताना संभाजीराजे जगताप यांनी सांगितले, "सत्यजित तांबे यांची 'गरजूंना मदत करा' ही शिकवण लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे."​फोटो ओळ: सासवड येथील पुरंदर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुर्यवंशी, युवा नेते संभाजीराजे जगताप आणि इतर मान्यवर.

Post a Comment

0 Comments