Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन सासवड प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने व अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी पुरंदर चे तहसीलदार विक्रम राजपूत प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. महाविद्यालयीन युवकांनी समाजाची गरज लक्षात घेता आज रक्तदान करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनीसामाजिक बांधिलकी जपण्याचे अहवाल उपस्थित विद्यार्थ्यांना व सहकार्यांना केले. या शिबिरात महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान करून रक्तदान शिबिरातील आपला सहभाग नोंदविला.या रक्तदान शिबिरास महाविद्यालयाचे कला विभागाचे उपप्राचार्य डॉ .संजय झगडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे प्रा. सुनील शिंदे प्रा. पूनम काळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर कुंभारकर यांनी केले. तर आभार शुभम ठोंबरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके , प्रा .नितीन लगड, प्रा. समीर कुंभारकर , महेंद्र वाघमोडे, अंकुश धायगुडे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे जतन केले. या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Post a Comment

0 Comments