Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड या ठिकाणी नारीशक्तीची दहीहंडी चषक 2025 चा महिलांच्या चारही संघाकडून अपयशानंतर एकत्रित प्रयत्न सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविघालय सासवड येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओहाळ यांच्या संकल्पनेतून मुलींची दहीहंडी स्पर्धा, समतेची दहीहंडी, नारीशक्तीची दहीहंडी हे घोषणा वाक्य घेऊन, साजरी करण्यात आली. दहीहंडी स्पर्धेत राजमाता जिजाऊ संघ, राजमाता अहिल्याबाई संघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई संघ, माता रमाई संघ असे एकूण चार संघ सहभागी झाले होते. परंतु पहिल्या संधी दरम्यान, चारही संघांना दहीहंडी फोडण्यात अपयश आले, त्यानंतर चारही संघांनी आपापसात चर्चा करून, एकत्रित दहीहंडी फोडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या संघाचे टी-शर्ट घातलेल्या या नारी शक्तीने कोणतेही मोठे कार्य करायचे असल्यास, सर्व स्त्रियांना एकत्रित येणे किती गरजेचे आहे, हे कृतीतून दाखवून दिले. दहीहंडीच्या दोरखंडाला स्त्रियांच्या उत्खनासाठी जगभराचे साहित्य लिहिले गेले, त्यांच्या पुस्तकाचे पहिले पान पताकाच्या रूपात सजविले होते. समीक्षा गोफने हिने दहीहंडी यशस्वीरीत्या फोडल्यानंतर, गोविंदा गाण्यावर मनसोक्त आनंद लुटला. मुलींची दहीहंडी यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मुलींना प्रोत्साहन दिले, या दहीहंडीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांना सामायिकरित्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते "नारीशक्ती दहीहंडी चषक 2025" चा देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments