Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री संत सोपानदेवांच्या सासवड भूमीत रंगला संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा... सासवड प्रतिनिधी: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्षाच्या निमित्तसासवड नगरपालिकेच्या वतीने आयोजित पालखी सोहळ्यास उदंड प्रतिसाद मिळाला. सजवलेल्या रथातील पालखीत संत श्री ज्ञानदेव महाराज यांची प्रतिमा, टाळ मृदंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या भाऊगर्दीत अभंगाच्या सुरावटीत, पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मुलन असे संदेश देणारे विद्यार्थी, फुगड्या व फेर धरणाऱ्या महिला भगिनी तुळशी वृंदावन डोई घेतलेल्या महिला वारकरी, मोठ्या संख्येने सहभागी झालेले बाल वारकरी,शंख निनादात हा पालखी सोहळा विशेष लक्षवेधी ठरला. सासवड शहराच्यामुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत संत सोपानदेव मंदिराच्या प्रांगणात या सोहळ्याची सांगता झाली. सासवड नगरपालिकेच्या वतीने आयोजित या उपक्रमात हनुमान भजनी मंडळ, संत सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत चांगा वटेश्वर देवस्थान ट्रस्ट, नगरपालिकेच्या सर्व शाळा, माजी सैनिक प्रतिष्ठानचे सदस्य, व्यापारी, जेष्ठ नागरिक ह भ प सुनील महाराज, स्वप्नील महाराज व गणेश महाराज यांच्या बाल वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकरी, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. पालिकेच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेला हा सोहळा मुख्य रस्त्याने भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात व नंतर संत सोपानदेव मंदिरासमोर आला. तेथे महाआरती व नगरपालिकेच्या वतीने काही प्रातिनिधिक सत्कार होऊन या सोहळ्याची सांगता झाली. पालिका मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरपालिका शाळांचे सर्व शिक्षक, संत सोपानदेव, संत चांगा वटेश्वर देवस्थानचे प्रमुख व सदस्य, वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व प्रमुख या प्रसंगी उपस्थित होते. ॲड गोपाळ गोसावी, सिद्धेश चोपदार, सुधाभाऊ गिरमे, मोहन चव्हाण, वामन जगताप, जनार्दन वाबळे, सखाराम लांडगे, रमेश जगताप (कारभारी) यांसह अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चांगा वटेश्वर देवस्थानचे वतीने या सोहळ्यासाठी रथ व पालखी देण्यात आली होती तर रमेश जगताप यांनी रथासाठी बैलजोडी उपलब्ध करून दिली पालिका शहर समन्वयक राम कारंडे, संकेत नंदवंशी, बजरंग जगताप, गजानन नरवाडे, जावेद मुल्ला ज्ञानेश्वर कामठे व अन्य सर्व पालिका अधिकाऱ्यांनी या देखण्या सोहळ्याचे आयोजन केले.

Post a Comment

0 Comments