Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी अंतर्गत घिसरेवाडी, नाटकरवाडी आणि विठ्ठलवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी यांच्या वतीने संस्थांचे विश्वस्त एडवोकेट विश्वासराव पानसे यांच्या माध्यमातून व भिवरी गावचे माजी सरपंच तथा पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप (आप्पा) कटके यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, याप्रसंगी भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ संचालक गुलाब घिसरे,  माजी उपसरपंच तुकाराम कटके, श्रीनाथ गोसावी बुवा तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष हनुमंत कामठे, पैलवान शेखर कटके, सुनील गोफणे, प्रकाश कटके, किरण कटके, कैलास अण्णा कटके, संतोष तात्या  घिसरे, संभाजी नाटकर, मनोहर घिसरे, राजेंद्र कटके, नितीन नाटकर, रोहित लोणकर व शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे शाळेची शैक्षणिक उपक्रम तसेच कला व क्रीडा क्षेत्रात यश मिळावं देशाचे सुजाण नागरिक बनवणे  विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत करून यश संपादन करावे, असे मत देवस्थानचे विश्वस्त एडवोकेट विश्वास पानसे यांनी व्यक्त केले. माजी सरपंच दिलीप (आप्पा) कटके यांनी आपली भिवरी गावातील शाळा शालेय साहित्य वाटप करण्यासाठी निवडल्याबद्दल मार्तंड देवस्थान ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments