सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सदस्य आरक्षण सोडत जाहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत आदेश पारित केले असून, जिल्हाधिकारी पुणे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला होता, त्या अनुषंगाने वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, यावेळी सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, कार्यालय अधीक्षक गजानन नरवाडे व अधिकारी कर्मचारी व सासवड शहरातील नागरिक, पत्रकार व विविध पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते, सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडतेचा कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात सुरू करण्यात आला. सर्वप्रथम वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर यांनी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांचे स्वागत केले व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र नगरपरिषदा प्रभागांमध्ये राखीव जागांची वाटप करणे, आणि त्या जागा चक्राणूक फिरवण्याची पद्धत नियम 2019 तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील आदेश दि. 3 ऑक्टोंबर 2025 यानुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी उपस्थितीना सभागृहामध्ये दिली. तसेच सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्याकरता, विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी मंजूर दिलेली ११ जुलै 2019 ते राजपत्र यामध्ये नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या व प्रवर्गांनी राखीव जागांची संख्या यांना मंजुरी प्रधान करण्यात आलेली आहे.तर विचारात घेतले जाणार आहे असेही सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले. व प्रभागांमधील आरक्षण निश्चिती करताना चिट्ट्या टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याबाबत उपस्थिती त्यांना माहिती देण्यात आली. प्रभाग मधील राखीव जागांची आरक्षण सोडीतिकारकाची त्या काढण्यासाठी संत नामदेव विद्यालय शाळा क्रमांक पाच सासवड या शाळेतील विद्यार्थी आदीराज देविदास तोटरे, अर्णव सचिन होळकर आणि चरण नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते चिट्ट्या काढण्यात आल्या, सर्व प्रभागांमध्ये जागांचे आरक्षण सुरक्षितरित्या पारदर्शक, बरणीमध्ये टाकून विहित कार्यपद्धती अनुसरून, उपस्थितीत मुलांच्या हातून उपस्थित सर्व नागरिक, प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठ्या काढण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले,त्यानुसार सोबतच्या तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जागा निश्चित करण्यात आल्या, अनुक्रमांक एक दोन प्रभाग क्रमांक 01 जागा: क्रमांक 01 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 01 व सर्व साधारण. तीन व चार, 02 दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला 02 व सर्वसाधारण. पाच व सहा प्रभाग क्रमांक 03, अनुसूचित जाती महिला, 03 ब सर्वसाधारण. अनुक्रमांक सात व आठ 04, प्रभाग क्रमांक 04, अनुसूचित जाती 04, बस सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक नऊ दहा प्रभाग क्रमांक 05 सर्वसाधारण महिला, 05, ब सर्वसाधारण. अनुक्रमांक 11 व 12 प्रभाग क्रमांक 06 अ सर्वसाधारण महिला, 06 व सर्वसाधारण. अनुक्रमांक 13 व 14.प्रभाग क्रमांक 07 सर्वसाधारण महिला, 07 ब सर्वसाधारण. पंधरा व सोळा प्रभाग क्रमांक 08 नागरिकांचा मागास प्रवर्ग,08 सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक 17 व 18 प्रभाग क्रमांक 09 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 09 ब सर्वसाधारण महिला. 19 व 20 प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 10 ब सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक 21 व 22 प्रभाग क्रमांक 11 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 11 ब सर्व साधारण. आरक्षणाबाबत सोडत पद्धतीने नुसार निश्चित केलेल्या प्रभाग नुसार आहे. जागेबाबत कोणतीही तक्रार असल्याचा आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर विथ कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली व वरील प्रमाणे नुसार पूर्ण प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे उपविभाग पुरंदर यांनी जाहीर केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments