विद्यार्थी रमले किल्ला बनविण्यात व किल्ल्याची माहिती घेण्यात विद्यार्थ्यांनी बनविला मुरुड जंजिरा किल्ला. सासवड पतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ( ता. पुरंदर ) येथील अल्पकाळात प्रगती केलेल्या गुरुकुल करिअर अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी किल्ले मुरुड जंजिरा हा किल्ला तयार केलेला असून हा किल्ला तयार करण्यामध्ये पृथ्वीराज टिळेकर, जय भोईटे, हरीश भुजबळ, श्रावण भगत, धनंजय कळसकर, वैष्णवी कुदळे, वैष्णवी जाधव, पूर्वा कादंबने, प्रेम ढोणे, राज ढोणे, दत्ता धायगुडे, साईराज शिंदे, शिवम कांबळे, मंथन देवकर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जंजिरा किल्ला बनवण्यामध्ये सहभाग घेतला. तसेच या किल्ला बनवताना प्लॅस्टिक मुक्त किल्ला ही संकल्पना राबवली तसेच देशभक्ती व इतिहासाचा अभ्यास यामधून त्यांना करता आला. यासाठी वीस बाय दहा असा पाण्यासाठी खड्डा घेऊन त्यामध्ये दहा बाय पाच या आकारामध्ये जंजिरा किल्ल्याची उबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली. तसेच त्याची संपूर्ण माहिती त्याची वैशिष्ट्ये तसेच आपल्याला काय शिकायला मिळेल या गोष्टींचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला. इतिहासाचा अभ्यास करून जंजिरा किल्ल्यावरील प्रत्येक गोष्ट शंभर टक्के नावानिशी दाखवलेली आहे यामध्ये गोड्या पाण्याचे तळे असेल, खारे पाण्याची तळी, तोफेचे प्रकार, 18 बुरुज, राणीचा महाल, गाव मस्जिद, अशा वेगवेगळ्या गोष्टी पाण्यामधील बोटी दाखवून हा किल्ला 400 वर्ष अभेद्य कसा आहे अजिंक्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य संदीप टिळेकर, प्राध्यापिका उषा टिळेकर तसेच शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चौकट : जनरली परीक्षा झाल्यावर विद्यार्थी बाहेर फिरायला जातात. पण पण आम्ही तसे न करता परीक्षा झाल्यावर आम्ही येथे किल्ला बनवण्यास सुरुवात केली. पाचवी ते बारावी असे विद्यार्थी गुरुकुल मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहोत. हा किल्ला बनवत असताना किल्ल्याची व इतिहासाची असणारी सांगड आमच्या लक्षात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम यांच्या कथा आम्हाला या माध्यमातून समजल्या व किल्ला बनविण्याचा प्रत्यक्ष आनंद उपभोगता आला.. विद्यार्थी जय भोईटे.हा किल्ला पाहण्यासाठी सासवड परिसरातुन लोक येत आहेत.सासवड शहरात माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून सासवड सांस्कृतिक मंडळ हे गेले 19 वर्ष किल्ला स्पर्धा घेत असल्याची माहिती सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी दिली. याचबरोबर बिनिंग पुरंदर यांच्या माध्यमातूनही तालुका किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही किल्ल्या संदर्भात स्पर्धा आहेत. फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथील गुरुकुल अकॅडमी येथे विद्यार्थ्यांनी बनविला जंजिरा किल्ला. किल्ल्याच्या बाजूस विद्यार्थी.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments