क-हे काठावर रंगली दिवाळी पहाट.. रसिकांनी दिली भरभरून दाद.. सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या वसू बारस निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एक काळ होता माणूस जागा व्हायचा तो लोकसंगीत आणि उठी उठी गोपाळा म्हणत भूपाळी त्याला उठवायची आणि मग सुरू व्हायचा रोजचा राम रगडा पण या सगळ्या दिवसभराच्या धामधुमीत इथल्या पारंपारिक लोककला त्याचं मन रिजवायच्या आता आधुनिक आणि चंगळवादाच्या पावटाळीत हा लोककलांचा खजिना हरवत चाललाय म्हणून माणसाची मन रिजवायला त्यांना पुन्हा आपली नाळ या मराठी मातीशी आहे हे दाखवून देणारा रस रुसून अनुभव असा हा भूपाळी ते भैरवी करा काठावर मोठ्या दिमाखात साजरा झाला यात पहाटेची भूपाळी जातीवरच्या ओव्या पिंगळा जोशाच होणार अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव हसवणारा बहुरूपी प्रबोधनात्मक कडकलक्ष्मी नटखट गवळण विनोदातून अध्यात्म सांगणारे भारुड शिवरायांचा इतिहास जाज्वल करणारी शाहिरी लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी लावण्यवतीची रंगार लावणी आपले कुळाचार सांगणारा गोंधळी वाघ्या मुरळी नंदीबैल पोतराज धनगर ओवी शेतकरी नृत्य गजन नृत्य कोळी नृत्य आदिवासी नृत्य अध्यात्माची नाळ जोडणारी दिंडी कीर्तन महाराष्ट्र सणांची महती सांगणारा सांगणारी संपरंपरा बैलपोळा ते गुढीपाडवा ऐतिहासिक दाखले देत वर्तमानपत्रावर भाष्य करणारे छत्रपती शिवरायांचे जाज्वल्य स्वागत आणि एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी अशा रंगारंग कार्यक्रमाने लोकांची मने जिंकली. हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संदीप टिळेकर, उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख, कार्याध्यक्ष एडवोकेट भगवान कोल्हे, सचिव राजेंद्र भैरवकर, रवींद्र क्षीरसागर, उत्तम एक्के, संचालक ॲड. काळुराम धिवार तुकाराम गिरमे, विलास गळंगे, रमेश वेदपाठक, अर्जुन भोंगळे, जयश्री गिरमे, विठ्ठल सूर्यवंशी, मंदार शितोळे, शैला शेवते, तसेच रोटरी क्लब पुरंदरचे अध्यक्ष प्रमोद धनावडे, भारती गायकवाड, तुषार जगताप, ॲड. आनंद जगताप, तसेच कृष्णा शेट्टी, गुलाब गायकवाड, अभिजीत बारवकर, रफिक शेख, संदीप टिळेकर, किरण भुजबळ, डॉ. सुमित काकडे, संतोष गायकवाड, सचिन कुदळे, अनिल उरवणे, आशिष शिंदे, विश्वनाथ गायकवाड, अश्विनी जगताप, राहुल जगताप या सर्वांनी भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून दिवाळी पहाटचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर अभिजीत कदम यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक पोवाडा सादर करून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे केले.यावेळी माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सासवडकरांच्या सुखदुःखात नेहमीच भजनी मंडळ कार्यरत असते.आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेऊन लोकांना दिवाळीचा आनंद देत आहे. या निमित्ताने स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांचा पाचवा स्मृतिदिन सर्वांच्या लक्षात राहील असे सांगून माजी आमदार संजय जगताप यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, सिद्राम भुजबळ, विजय वढणे, संदीप राऊत, दीपक जांभळे, तानाजी झेंडे, अनिल गद्रे,अनिल कदम, प्रा. डॉ. नारायण टाक आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments