Hot Posts

6/recent/ticker-posts

कऱ्हाकाठावर रंगली दिवाळी पहाट.. सासवडला शहर पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माझी मैना गावाकडं राहिली. चांदणं चांदणं रातीला.. काळया मातीत मातीत.. एक राधा एक मीरा... लंबी जुदाई.. आली माझ्या घरी ही दिवाळी अशा एका पेक्षा एक सुरेल रचनांनी सासवडचां कऱ्हा काठ भल्या पहाटे दुमदुमून गेला. निमित्त होते पत्रकार संघ सासवड शहरच्या दिवाळी पहाट महोत्सव कार्यक्रमाचे आणि हे सुंदर सादरीकरण केले होते ज्योती शाम गोराणे यांच्या जल्लोष सप्त सुरांचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाने. सुमारे तीन तासांहून अधिक काळ हा संगीत प्रवास रसिकांनी अनुभवत टाळ्यांनी प्रतिसाद दिला. माजी आमदार संजय जगताप, सौ राजवर्धीनी जगताप जिल्हा भाजप अध्यक्ष शेखर वढणे व सौ योगिनी वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह मोठ्या संख्येने रसिकांनी या आनंददायी कार्यक्रमास हजेरी लावली. येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारी पहाटे आचार्य अत्रे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व रंगमंच पुजा करून विजय कोलते, प्रदिप पोमण, हेमंत भोंगळे, विजय वढणे, संजय गणपत जगताप,शेखर वढणे व शाम गोराणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. भूपाळी, वासुदेव, गोंधळ, लावणी, भक्ती गीत, हिंदी मराठी चित्रपट गीते व सोबतीला भाग्यश्री राऊत आणि ऋचा पाटील यांची नृत्ये, बाल संबळवादक हर्षल शिंदे याचे वादन कार्यक्रमाची रंगत वाढवणारे ठरले. ताकतीच्या गायिका ज्योती गोराणे व त्यांच्या समवेत भक्ती कापसे, पुजा वाणी, आरती मीठे यांच्या एका पेक्षा एक सुरेल रचनांनी सासवडचां रसिक तृप्त झाला. शाम गोराणे यांच्या संगीत संयोजनाखाली ढोलकीपटू डॉ वैष्णवी गित्ते, पखवाज वादक ज्ञानेश्वरी क्षीरसागर, की बोर्ड हर्षवर्धन मोरे, पॅड अजय उनवणे , पाटील यांची ध्वनी व्यवस्था व सुनिता निंबाळकर आणि पंकज चव्हाण यांचे निवेदन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात ज्येष्ठ गायिका ज्योती गोराणे, माजी आमदार संजय जगताप, भाजप जिल्हाअध्यक्ष शेखर वढणे, सासवड शहर अध्यक्ष आनंदभय्या जगताप यांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेखर वढणे व संजय जगताप यांनी यावेळी उपस्थित रसिकांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. संघाचे खजिनदार हेमंत ताकवले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष सुधीर गुरव यांनी प्रास्तविक केले तर सचिव गणेश मुळीक यांनी आभार मानले. याच कार्यक्रमात संघाच्या नवीन कार्यकरणीची घोषणा सुधीर गुरव यांनी केली. विजय कोलते, हेमंत भोंगळे, प्रदीप पोमण, राजवर्धीनी जगताप, योगिता वढणे, नीता सुभागडे, वसंत ताकवले, नंदकुमार सागर, प्रा संदीप टिळेकर, डॉ संजय रावळ, संजय चव्हाण, नंदूकाका जगताप, ॲड दिलीप निरगुडे, अशपाक बागवान, मंजुश्री निरगुडे, दत्तात्रय काळबेरे, डॉ प्रवीण जगताप, सुमित काकडे, विजय वढणे, संतोष गिरमे, प्रकाश ढवळे, मोहन चव्हाण, माऊली गिरमे, शरद बोबडे, धनंजय साबळे यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या आनंददायी कार्यक्रमास हजेरी लावली. जीवन कड, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र बर्गे, संभाजी महामुनी, नितीन यादव, तानाजी सातव, जगदीश शिंदे, संदीप जगताप, बापू मुळीक,अरसलान बागवान, सुनिल वढणे, गौरव कोलते, मनोज मांढरे या संघाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले

Post a Comment

0 Comments