Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील दिवे आणि भिवडी गणाकडे पुरंदर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती पद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सभापती आणि सदस्य पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली ,मागील जवळपास तीन वर्ष निवडणूक झाली नसल्याने, मागील आरक्षण विचारात घेतली गेली नाही, ती शितील करण्यात आली, पुरंदर पंचायत समिती साठी आठ गण आहेत ,दिवे, गराडे, निरा, कोळविहीरे ,बेलसर ,माळशिरस, वीर, भिवडी असे आठ पंचायत समिती गण आहेत ,8 पंचायत समिती सदस्य आणि सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली, त्यामध्ये सर्वात प्रथम सभापती पदाची सोडत काढण्यात आली तर सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे ,त्यामुळे पंचायत समिती गणाच्या आरक्षणामध्ये ज्या गणांना ओबीसी हे आरक्षण राखीव असेल तो पंचायत समिती सभापती पदी विराजमान होईल, हे स्पष्ट झाले आहे. सोमवार दि. 13 रोजी पंचायत समिती येथे पंचायत समिती प्रशासक आणि पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि गट विकास अधिकारी पुरंदर प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीमध्ये आठही गणाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये दिवेगणास ओबीसी सर्वसाधारण आणि भिवडी गणांमध्ये ओबीसी महिला आरक्षण सोडत निघाली त्यामुळे, आता दिवे आणि भिवडी पंचायत समिती गण मधूनच सभापती ठरणार हे सिद्ध झाले आहे. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट असून, 50 गराडे सर्वसाधारण महिला ,51 बेलसर सर्वसाधारण ,52 वीर सर्व साधारण, 53 नीरा शिवतक्रार नागरिकांचा मागास वर्ग महिला. सभापती पदी कोणाची वर्णी लागणार ?मागील पंचवार्षिक म्हणजेच 2017 मध्ये दिवे आणि भिवडी गणाचे सदस्य हे सभापती पदी विराजमान झाले होते, तर या दोन्ही गणातील जागा शिवसेना (धनुष्यबाण) यांनी जिंकले होत्या, प्रामुख्याने दिवेगणातील अर्चना समीर जाधव तर भिवडी गणातील नलिनी हरिभाऊ लोळे या सभापती पदी विराजमान झाल्या होत्या ,तर यंदाही दिवे आणि भिवडी गणाला सभापतीपदाची संधी आहे, आता सभापती पदी कोण वर्णी लागणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments