पुरंदर तालुक्यातून सासवड ते आंबेजोगाई एसटी बस सेवा सुरू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड आगारांमधून गुरुवारी दि.16 पासून सासवड ते स्वारगेट इंदापूर बार्शी मार्गे आंबाजोगा ई आणि सासवड जेजुरी बारामती मार्गे अक्कलकोट बस सेवा सुरू केली आहे ,त्याबरोबरच सासवड गोंदवले बस सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे ,असे प्रवासी वर्गाने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन, आगार प्रमुख सागर गाडे यांनी केले आहे. गुरुवारी दि. 16 सकाळी सात वाजता आंबाजोगाई बस चे उद्घाटन प्रवासी महिलांच्या हस्ते करण्यात आले, आणि वाहतूक नियंत्रक महेश भोंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि प्रवासी वर्गाला पेढे भरून बस सेवेचा प्रारंभ केला आहे. यावेळी आगार प्रमुख सागर गाडे, नियंत्रक पोपट जैनक, कैलास जगताप, राहुल टिळेकर, अच्युत नागरगोजे, वाहक आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानक उपाहारगृहाचे मालक सारंग लोणकर यांनी उपस्थित राहून स्वत: सर्व उपस्थित मंडळींना चहापाणी केला, सकाळी स्वारगेट कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गामध्ये आणखी एक बस मार्गामुळे समाधान व्यक्त केले जात आहे, या बस सेवेला पहिल्या दिवशीच 18 प्रवाशापेक्षा जास्त स्वारगेट ते आंबेजोगाई थेट आरक्षण सेवेत मिळालेले आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तानाजी सातव यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments