Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी जेरबंद;तर सासवड पोलिसांची कारवाई सहा जनावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: टावर लाईन प्रकल्पाच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारे अविनाश लक्ष्मण कोळेकर रा. दत्तनगर हनुमान वाडी आळंदी देवाची केळगाव ता.खेड ऋषिकेश अर्जुन माळी रा. दुसरा मजला साई कॉलनी बालाजी नगर चाकण यांना सासवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचे साथीदार दिपक विनोद भगत रा. नाणेकर वाडी चाकण पुणे इतर दोन ते तीन जणांना पळून जाण्यात यश आले, याबाबत दिनानाथ नारायण गोंगारी मुख्य तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 925 प्रशासकीय इमारत तिसरा मजला कुंभारवाडा कसबा पेठ पुणे 11 यांनी याबाबत फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012 पासून थापेवाडी, गराडे मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कंपनीने 400के. व्ही जेजुरी हिंजवडी टावर लाईन प्रकल्पाचे काम चालू केले होते, त्यानंतर प्रकल्पाचे काम कोडीत, गराडे, सोमरडी, मठवाडी, थापेवाडी या गावाच्या हद्दीत चालू होते, सन 2014 मध्ये काही कारणास्तव ते काम बंद पडले होते. प्रकल्पाचे काम कोडित मध्ये पूर्ण झाले नसून, सध्या ते बंद स्थितीमध्ये आहे. शुक्रवार या दिवशी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान, चोरी करून कोडीत येथून ॲल्युमिनियमच्या चोरीच्या तारा घेऊन जाणारी गाडी सासवडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाली होती यासाठी, त्यांनी तपास पथक रवांना केले, या पथकाने कारवाई करून तारा चोरून, घेऊन जाणारा टेम्पो एमएच १४ एलबी 74 26 तारा तसेच चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य असं पकडले. या तीन लाख 48 हजार 750 रुपयाच्या सहाशे चाळीस स्क्वेअर मिली मीटरच्या 2325 किलो वजनाच्या तारा टेम्पो, असे एकूण पाच लाख 99,150 मुद्देमाला सह ताब्यात घेतला, त्यांचे अन्य साथीदार हे पळून गेले आहेत, या प्रकरणांमध्ये पोलीस अमलदार बापूराव म्हेत्रे, शिवानी बाबर, पोलीस हवालदार सुहास लाटणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी चोरीच्या ॲल्युमिनियमच्या तारांनी भरलेला टेम्पो सासवडच्या या पोलिसांनी जप्त केला, तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करत आहेत.

Post a Comment

0 Comments