Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी सह परिसरामध्ये खुले आम अवैध धंदे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात विशेषत सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सतत वाढत असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची प्रश्न गंभीर बनला आहे, अवैद्य मद्य विक्री, गांजा, जुगार, मटका व देह विक्री यासारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा, आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील परिसरातील या अवैध धंद्यावर कारवाई व्हावी यासाठी आरपीआयचे विष्णू भोसले व सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी वारंवार निविदने दिलेली आहेत, हॉटेल व्यवसाय कावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भिवडी येथील ग्रामस्थांनी व उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि सासवड पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला अशा अनेक तक्रारी देऊन, सुद्धा ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. मताच्या राजकारणामुळे या परिसरामध्ये कोणी लक्ष देत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केलेला आहे, या अवैध धंद्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना थेट सहभाग असल्याचा, गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत, नुकत्याच गुटक्याच्या ट्रक सोडून, दिल्या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या निरीक्षकांसोबतचे संभाषण, समाज माध्यमातून प्रसारित झाले आहे, यापूर्वी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्य धुंद अवस्थेत सुरक्षा रक्षकाला चिरडून ठार केल्याच्या घटनेमध्ये सुद्धा पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची चर्चा होती, तसेच अवैध धंद्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून काही महिन्यापूर्वी दोन पोलिसांचे निलंबन ही झाले होते, तसेच जेजुरी येथील व परिसरामध्ये अवैध धंदे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फोपावलेले आहेत, पिसे,राजुरी शिवरी येथील शेतकऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये बीट अंमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे आरोपी संगे संगणमत असल्याने, सहा सहा महिने झाले फिर्यादीचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत, टाळाटा करतात आरोपी या कडून आर्थिक हितसंबंध बीट अमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत तेव्हा त्यांना त्वरित निलंबित करावे अशी अवैध धंदेच्या बाबतीमध्ये, सुद्धा व सहा महिने झाले गुन्हा दाखल न केल्यामुळे, कारवाई करावी यासाठी सर्वसामान्य नागरिकांची याबाबत मागणी आहे. पुरंदर तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय व बेकायदेशीर सावकार की बंद करण्याची मोहीम घेणार आहेत. नागरिकांनी कोणालाही न घाबरता अशा अवैध धंद्याच्या, व्यवसायांची माहिती फोटो किंवा ठिकाणचा तपशील 9011079622 या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पाठवावा. तक्रारीची गोपनीयता राखून संबंधितावर कारवाई, कायदेशीर पद्धतीने करण्यात येईल कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस ठाणे. पुरंदर तालुक्यातील सासवड परिसरातील कोठेही अवैध व्यवसाय किंवा बेकायदेशीर सावकारकीची स्थिती आढळून आल्यास, नागरिकांनी आम्हाला त्वरित माहिती द्यावी, त्यांच्या नावाची पूर्ण गुप्तता राखली जाईल, तसेच अवैध व्यवसाय करणारे आणि खाजगी सावकारी यांचा पूर्ण बीमोड करण्यासाठी, आमचे पथक तयार करत आहोत .असे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, कोणालाही न घाबरता वैयक्तिक मोबाईलवर क्रमांक 97 64455555 वर संपर्क साधावा. राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग.

Post a Comment

0 Comments