Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये 2800 हरकती प्राप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवर तब्बल 2800 हरकती प्राप्त झालेल्या आहेत, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमामुळे सासवडमध्ये सध्या मोठी लगबग दिसून येत आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सदस्य तसेच थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी यांचा मतदार यादी कार्यक्रम 2025 रोजी जाहीर केला होता, त्यानुसार सासवड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी नगरपरिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर तसेच सासवड नगरपरिषद कार्यालयात पाहणी साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तसेच प्रभाग निहाय यादी डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध होत आहे, महाराष्ट्र राज्याची निवडणूक आयोगांच्या सचिवांच्या पत्रानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याच्या कालावधीमध्ये दि. 17 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, या मुदत वाढीमुळे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे 28 हरकती प्राप्त झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या संख्येने हरकती प्राप्त झाल्याने, मतदार यादी तयार करण्याच्या कामात मोठा गोंधळ उडालेला आहे, आता या प्राप्त हरकती व सूचनावर विचार करून, मतदार यादी अंतिम करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे निर्णय घेणार आहेत, अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 31 ऑक्टोबर असून, मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख सात नोव्हेंबर असल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले दरम्यान, पालिका कर्मचारी मतदारांच्या घरोघरी जाऊन स्थळ तपासणी करून योग्य प्रभागांमध्ये नोंदणी करित असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments