वाघीरे महाविद्यालय सासवड येथे जीआयएस कायॅशाळा आयोजित सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सासवड येथे 26 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात भूगोल विभागाअंतगॅत भौगोलिक माहिती प्रणालीची जीआयएस या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाची ओळख व उपयुक्तता याबाबतच्या वृत्त निर्माण करण्याचा तसेच यामधील नोकरीच्या संधी यामागे मुख्य उद्देश होता, कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित; शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. संजय झगडे सर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून जीआयएस तज्ञ प्रा. डॉ. गणेश काशिनाथ मधे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे) यांनी विद्यार्थ्यांना जीआयएस म्हणजे काय, याचा उपयोग, प्रकार, तसेच शैक्षणिक व रोजगाराच्या दृष्टीने जीआयएस मधील करियर, संधी यावर सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सॉफ्टवेअर द्वारे डेमो नकाशा तयार करणे, डेटा विभागातील विश्लेषण अशा विविध बाबीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रस्तुत अनुभव घेता आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार घोरपडे कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोडरे, प्रा. प्रतीक्षा पोमण, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे, प्रा. करिष्मा बरकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुभाष नपते, इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी अनुजा सावंत या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतीक्षा पोमण यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती भोसले यांनी मानले. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात अशा कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी मागणी ही विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments