Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणच्या प्रकरणातील आरोपी चार अटक तर आज दोन आरोपी सकाळी अटक सासवड प्रतिनिधी: विर (ता. पुरंदर) या ठिकाणी समृद्धी बियर बार हॉटेलमध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापसिंग धुमाळ, शंभूराज महादेव धुमाळ (रा. सर्व वीर) यांना सासवड पोलिसांनी दि.27जुलै रोजी अटक केली आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून या सहा जणांनी सौरभ वाघ यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र या गुन्ह्यात स्पष्टपणे सहभागी असलेले माजी पंचायत समिती सदस्य दिलीप विलास धुमाळ आणि श्री शेत्र वीर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल अप्पासो धुमाळ यांना आज 28जुलै रोजी सकाळी सासवड पोलीस स्टेशनने अटक केली अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments