Hot Posts

6/recent/ticker-posts

तुमच्या मुला मुलीवर स्वप्नही लादू नका: मुख्याध्यापक भाऊसो बडधे सासवड प्रतिनिधी: मुलांना वाढविणे आणि एक प्रकारचे घडविणे यामध्ये फरक हा आई-वडिलांनी लक्षात घ्यावा, आपण आपली अर्धवट स्वप्नेही राहिलेली आपला मुलावर लादून त्यांना घडविण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्यांचे अंतर्मन ओळखायला शिका, त्यांचे कल ओळखायला शिका, त्यांची स्वप्ने त्यांना पाहू द्या, तुम्ही फक्त त्यांना साथ द्या, म.ए.सो बालविकास मंदिर शाळेत पालकांना एक प्रकारे रहस्य पालकत्वाचे समजून सांगताना, मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी आपले विचार मांडले.सासवड (ता. पुरंदर) येथील म.ए.सो बालविकास मंदिर शाळेत पालकांचा पालक सभा उत्साहात पार पडली. पालक सभेची सुरुवात स्वागत गीत करून, सादर करताना, विद्यार्थिनी स्वागत केले. आपल्या पाल्याला वाढवणे, आणि घडवणे यातील अंतर आपण ओळख खायला शिका,पाल्यामधील सप्त गुण हे लहानपणापासूनच कळले, तर त्याचा विकास होण्यास मदत होते, पाल्याला त्याच्या कलानुसार शिक्षण घेण्याचे प्रत्येक आई-वडिलांनी मदत करावी. पाल्यामध्ये जे गुण आहेत, त्याच्या योग्य दिशेने विकास करणे, हे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे, यासाठी प्रत्येक पालकांशी हसत खेळत संवाद साधला तर मुले ही अनुकरणातून शिकतात, त्यामुळे सल्ला देण्याऐवजी सर्वप्रथम पालकाने त्यांच्यासमोर आदर्श घालून दिला पाहिजे, ज्यामुळे पालकांचे बघूनच विद्यार्थी हा शिकेल, असेही त्यांनी सांगितले. विविध समित्यासाठी निवडी यानंतर शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील सरकारने ठरवून दिलेल्या, महत्वाच्या चार समित्यांमधील सदस्यांची निवड ही उपस्थित पालकांमधूनच, करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकासन समिती या सर्व समितीचे गठन पालक बंधू -भगिनी मधूनच करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्या योगेश टकले, उपाध्यक्ष डॉ. राकेश नामदेव आत्राम यांची निवड करण्यात आली असून, सखी सावित्री समितीचे अध्यक्ष सीमा संदीप काळे यांची निवड झाली आहे, महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष मंजुषा सुनील चोरमाले,उपाध्यक्ष पुजा कुलदिप निगडे यांची निवड झाली आहेच, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समितीचे अध्यक्ष पत्रकार बापू राजाराम मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्याध्यापक भाऊसो बडधे, कुमुदिनी पांढरे, नरेंद्र महाजन, डॉ. राकेश आत्राम, सेविका रेखा कारके, सविता काळे, वृषाली राजपुरे, माता, पालक वर्ग बहुसंख्येने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंजुषा चोरमाले यांनी केले. सूत्रसंचालन शारदा यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिना खोमणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments