वाघीरे महाविद्यालय सासवड येथे जागतिक निसर्ग संवर्धन् दिनानिमित्त पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन सासवड प्रतिनिधी: सासवड येथील वाघिरे महाविद्यालय सासवड येथे वनस्पतीशास्त्र विभाग, पाणी पंचायत खळद, तसेच् इला फौंडेशन, पिंगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त "पर्यावरण जागृती अभियानाचे " आयोजन करण्यात आले. या अभियानाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज् कुमार पवार , इला फौंडेशन व प्रशांत बोरावके , समन्वयक् पाणी पंचायत उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पंडित शेळके यांनी महाविद्यालयामधे पर्यावरण संवर्धनासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले, तसेच पुरंदर सारख्या कमी पाऊस असणाऱ्या विभागामध्ये असून देखील ठिंबक सिंचन तंत्रज्ञान वापरून महाविद्यालयामध्ये नवीन वृक्षलागवड व संगोपन करून बहरलेल्या वृक्षसंपदेची देखील माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशांत बोरावके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शाळा व महाविद्यालयामधे राबवीत असणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच आत्तापर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती मध्ये सहभाग घेतल्याचे नमूद केले. यावेळी राजकुमार पवार यांनी नागपंचमी या सणाच्या निमित्ताने या सणाचे ग्रामीण भागातील सांस्कृतिक महत्व नमूद करताना सापाच्या विविध प्रजाती बद्दल विद्यार्थ्यांला मार्गदर्शन केले. यावेळी विषारी सर्प व बिनविषारी सर्प कसे ओळखावे तसेच त्यांची शास्त्रीय माहिती , समाजामध्ये असणाऱ्या मिथक आणी तथ्य तसेच सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाच्या प्रथमपचाराची तसेच आवश्यक वैद्यकीय उपचाराची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवीला.या उपक्रमाचे आयोजन वनस्पती शास्त्र विभागाने प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.शीतल काल्हापुरे यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे परीचय डॉ. विद्या पाटणकर, सूत्रसंचालन् प्रा.शुभम ठोंबरे आणी आभार प्रदर्शन डॉ.स्वप्नील जगताप यांनी केले. प्रणिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.भाग्यश्री मदभावीकर, वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा.प्रियांका गायकवाड, संतोष पवार, संतोष लोणकर,शरद यादव, संदीप दगडे उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments