Hot Posts

6/recent/ticker-posts

भिवरी येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केले सासवड प्रतिनिधी: भिवरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे ,शंकर नारायण लोणकर (वय -54 रा. भिवरी ता. पुरंदर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. लोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल दादासो कामठे, दादासो कामठे( दोघे रा. येवलेवाडी पुणे) आणि जालिंदर निंबाळकर (पूर्ण त्याचे नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणकर यांनी एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या गट नंबर 561 मधील पाच गुंठे जमीन विक्रीसाठी काढली होती, निंबाळकर यांच्या ओळखीने विशाल कामठे आणि दादासो कामठे यांनी ही जमीन 17 लाख 50 हजार रुपयांना विकत घेण्याचे ठरवले, सुरुवातीला नऊ लाख रुपये इसारा पोटी दिले, मात्र उर्वरित तेरा लाख रुपये देण्यात टाळाटाळ करत होते, लोणकर यांनी इसार पावती रद्द करण्याची मागणी केली असता, त्यांनी नऊ लाख रुपयावर चार लाख 50 हजार रुपये व्याज मागितले, लोणकर यांनी हे व्याज दिले तरीही, त्यांनी इसारा पावती रद्द केली नाही. उलट जास्त व्याजापोटी आणखी चार लाख रुपये मागितले आणि न दिल्यास 16 गुंठे शेत जमिनीवर ताबा घेण्याची धमकी दिली, विशाल कामठे, दादासो कामठे आणि निंबाळकर यांनी शनिवारी तारीख 26 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारामध्ये लोणकर यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली आणि चार लाख रुपये व्याजाची मागणी केली, तसेच 16 गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यास सांगितले, मागणी पूर्ण न झाल्यास हात ,पाय तोडण्याची आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, या त्रासाला कंटाळून लोण कर यांनी औषध पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला, सध्या लोणकर यांच्यावर सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चोरगे ए.एस पुढील तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments