Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये भक्तीमय वातावरण सासवड प्रतिनिधी: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 28 सासवड (ता. पुरंदर) येथील करा काठावरील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी उत्साह वातावरणात दर्शन घेतले, मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे दिवसभर संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात नाहून गेला होता, दरम्यान रविवारी दि. 27 पासूनच मंदिरात भक्तीचा जागर सुरू झाला होता ,श्री सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे भाविकांना मंत्रमुक्त केले, पहाटे पाच वाजल्यापासून रुद्राभिषेक सुरू झाले, पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते सकाळी महापुराभिषेक आणि त्यानंतर महाआरती झाली. उत्तरा देवीच्या रिश्टेबल ट्रस्ट वेंकटेश राव यांच्या वतीने अभिषेक झाला. याप्रसंगी मंदिर परिसरात आणि शिवपिंडीला फुलाची सजावट आणि शृंगार करण्यात आला, यावेळी महाप्रसाद संजय जगताप मित्रपरिवार तसेच अजित जगताप, अतुल जगताप ,तुषार जगताप, डॉ. समीर काकडे, संदीप मेरुकर, प्रा. संदीप टिळेकर, आबा जगताप, नंदकुमार जगताप, सुनील जगताप, पुनम चौधरी, राजेंद्र गिरमे यांच्यावतीने देण्यात आला. रविवारी रात्रीपासून भाविकांची जलाभिषेक सुरू होते, सिद्धेश्वर महादेव देवस्थानच्या वती_ने संदीप जगताप व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments