Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्नश्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर दुमदुमला कानिफनाथ महाराज की जय चा जयघोष सासवड प्रतिनिधी: दि.29 बोपगाव (ता. पुरंदर )येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रकट दिन सोहळ्यानिमित्त श्री सदगुरू शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर मठाधिपती गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३०१ यज्ञकुंड द्वारे दत्तयाग व नवनाथ याग यज्ञ सोहळा पार पडला. यावेळी हजार भाविकभक्तांनी गडावर उपस्थित राहून कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी गडावर सर्वत्र कानिफनाथ महाराज की जयघोष दुमदुमत होता. श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे ,उपाध्यक्ष दिपक फडतरे ,सचिव जयवंत फडतरे ,खजिनदार नागेश फडतरे ,संचालक शिवाजी जगदाळे ,प्रकाश(नाना)फडतरे ,प्रकाश(आप्पा )फडतरे , सुरेश फडतरे ,महादेव फडतरे ,नितीन फडतरे, रमेश फडतरे,मंगेश फडतरे, सोनबा फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे , पांडुरंग बाठे व बोपगावकर ग्रामस्थ यांनी केले. दत्तयाग व नवनाथ याग प्रसंगी उद्योजक दयानंद फडतरे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, शिवसेना नेते दादासाहेब जगदाळे आदींसह पुरंदर मधील बहुसंख्य शाळा, विद्यार्थी ,शिक्षक, बोपगावकर ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महेश शिरसठ, तुषार घुले, प्रसाद हरपळे, स्वप्निल सातव, ऋषिकेश कामठे, गोकुळ धावडे यांनी महाप्रसाद पंगतीसाठी अन्नदान केले. यावेळी श्री चैतन्य सद्गुरू कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे ४ ते ५.५० वा. काकड आरती व भजन, पहाटे ५ ते ६ वा. सहस्त्र दुग्धधारा महाभिषेक, स. ६ वा. महाआरती, स. ६.१५ ते ६.४५ श्री सदगुरु नवनाथ भक्तांच्या ओव्या गायन, स. ६.४५ ते ७.३० वा. साळुंखे बंधूंचे सुस्वर अभंग वाणी भजन, स. ७.३० ते ८.३० नवनाथ ग्रंथ ४० वा अध्याय पारायण वाचन, स. ८.३० ते ११.३० वा. दत्त याग, नवनाथ याग होम हवन, सकाळी ११.३० ते १२ वा. १०१ भोग नैवेद्य परिक्रमा, दु.१२.३० वा. कानिफनाथ महाराज जन्म सोहळा, दुपारी १२.४५ वा. महाआरती व महाप्रसाद, दु.१ वा. कानिफनाथ महाराज मंदिर पालखी प्रदक्षिणा मिरवणूक, दु. १ ते २ वा. आखाडा व छबीना बोपगाव ग्रामस्थ, दु. २ ते ४.३० वा. साम्राज्य प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथक, सायं. ६ वा. हरिपाठ, रात्री महाआरती याप्रमाणे धार्मिक विधी संपन्न झाले. बातमी सोबत फोटो पाठवीत आहे.फोटो ओळी - बोपगाव (ता.पुरंदर) येथील श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकटदिन प्रसंगी भाविक भक्त

Post a Comment

0 Comments