Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.स्वप्नील जगताप, प्रा.पूर्वाराणी जगताप, अमोल भोसले व कुचेकर यांनी शूटिंग स्पर्धेत बाजी मारली सासवड प्रतिनिधी:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २६ जुलै २०२५ रोजी वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शूटिंगचे राष्ट्रीय खेळाडू शंतनु पांगारकर उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाटन उपप्राचार्य डॉ.संजय झगडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे, मीरा चिकने, रवि जाधव, प्रा.सचिन शाह, डॉ.नितीन लगड, शैलेंद्र राऊत आदी. उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणेवरिष्ठ महाविद्यालय पुरुष गट : प्रथम क्रमांक - डॉ.स्वप्नील जगताप(वनस्पती शास्त्र विभाग) ३७ पॉईंटस, द्वितीय क्रमांक- प्रा.सुजितकुमार देसाई(सूक्ष्मजीव शास्त्र विभाग) ३५ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - डॉ.सुनील शिंदे(मानसशास्त्र विभाग) ३५ पॉइंट्स. वरिष्ठ महाविद्यालय महिला गट : प्रथम क्रमांक - प्रा.पूर्वाराणी जगताप (मानशास्त्र विभाग) २५ पॉइंट्स, द्वितीय क्रमांक - प्रा.अर्चना मगर (अर्थशास्त्र विभाग) २४ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - प्रा.मानसी जोशी (सूक्ष्मजीवशास्त्र विभाग) २३ पॉइंट्स. प्रशासकीय कर्मचारी पुरुष गट : प्रथम क्रमांक - अमोल भोसले(विज्ञान विभाग) २९ पॉइंट्स,द्वितीय क्रमांक - प्रमोद भोसले(परीक्षा विभाग) २७ पॉइंट्स,तृतीय क्रमांक - बालाजी ताकमोगे (कार्यालय विभाग) २६ पॉइंट्स. प्रशासकीय कर्मचारी महिला गट : प्रथम क्रमांक - कल्पना कुचेकर(कार्यालय विभाग) २४ पॉइंट्स, द्वितीय क्रमांक - मयुरी जगताप(कार्यालय विभाग) २२ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - कल्पना म्हस्के(विज्ञान विभाग) ०५ पॉइंट्स.

Post a Comment

0 Comments