अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या सासवड प्रतिनिधी:अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर तालुका शाखेची कार्यकारिणी बैठक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे पार पडली. ही बैठक संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि कार्यपद्धतीसंदर्भात महत्त्वपूर्ण ठरली.बैठकीस तालुका अध्यक्ष शलील महाराज जगताप, युवक अध्यक्ष आकाश ढुमेपाटील, शहर युवक अध्यक्ष अक्षय मारणे, राजाभाऊ जगताप, जयेंद्र निकम, विनोद जगताप, सुभाष जेधे, बाबुराव गायकवाड, तसेच विशाल बारसुडे, अनिकेत हरपले, विवेक उबाळे आणि अनेक युवक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकस्थळी वेळेआधी उपस्थित राहून संघटनेच्या विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा केली. संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने नव्या उपक्रमांची आखणी करण्यात आली.बैठक सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली असून, आगामी काळात तालुकास्तरावर संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments