जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार; हा पुरस्कार माझ्यासाठी नाही तर समाजामधील प्रत्येक महिलेसाठी हा पुरस्कार आहे :डॉ. निलम गोरे सासवड प्रतिनिधी: समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून, सन्मानित करण्यात त्यांना आले. होळकर संस्था इंदोरचे राजे भूषण सिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. निलम गोरे म्हणाल्या की, हा पुरस्कार माझ्यासाठी नाही तर समाजातील त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्या आपल्या हक्कासाठी शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. जेजुरी परिसरातील मुरुळी प्रतीच्या निर्मूलनासाठी सातत्याने काम करून, जवळपास 200 महिलांना व मुलींना या प्रतीतून मुक्त केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाज परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हेच अहिल्यादेवी होळकर यांना खरी आदरांजली ठरेल. त्यापुढे म्हणाल्या की, राजकारणात विचार बेध असले, तरी चांगल्या कामांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आमदार निधीतून जेजुरी व इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासास हातभार लावला आहे. महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याण चे काम हीच माझी खरी ध्येयपूर्ती आहे. जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, दिलीप बारभाई, ममता लांडे, दिलीप यादव, मंगेश घोणे, माई कोलते , गौरव कोलते, बंडूकाका जगताप, शांताराम पोमण, कला फडतरे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे,संदीप टिळेकर,अरुण जोशी,राजाभाऊ पेशवे,पंकज निकुडे,रमेश( कारभारी) जगताप, रोहिदास कुंभार, विठ्ठल सोनवणे, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते. कायॅकमात मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले. प्रास्ताविक विजय कोलते यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन शांताराम पोमण यांनी केले. तर आभार बंडूकाका जगताप यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments