Hot Posts

6/recent/ticker-posts

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील साबळे फार्मसी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती सासवड प्रतिनिधी: अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड या ठिकाणच्या क्षेत्रांमध्ये वृक्षारोपण करताना प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी हा उपक्रम पार पाडला. या फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुवर्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यात विद्यार्थ्यांनी व पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत परिसरात सायकल फेरी काढली. रस्त्यावर प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम व पर्यायी यावर लक्ष केंद्रित करत विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच परिसरामध्ये वृक्षारोपण करत 'एक झाड एक श्वास' हा संदेश देण्यात आला. कल्पनाशक्ती स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी संकल्पना मांडल्या. जेणेकरून उद्याची शास्वत भविष्य घडविता येईल, रोग जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायावरील पोस्टर सादरीकरण करून, आरोग्य विषयक जनजागृती करत विविध आजारांचे निदान व प्रतिबंध यावर माहिती देण्यात आली. रक्तदान शिबिरात 'एक थेंब रक्त' अनेकांना जीवन' या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. जीवनवर्धिनी मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. स्वच्छता मोहिमेद्वारे परिसर स्वच्छता असा संदेश देत विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी सफाई करत, जनजागृती केली. या उपक्रमा मागील प्रमुख हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे, आरोग्य व पर्यावरण बाबत सहजता वाढवणे, तसेच समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा होता विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारे या स्पर्धा व उपक्रमांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण संघ भावना व जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करण्यात आली.

Post a Comment

0 Comments