पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील युद्ध स्मारक व अमर जवान चौक न्यायालयासमोर ,पुरंदर तालुका माजी सैनिक प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी दि. 26 रोजी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9:15 वाजता शिवतीर्थ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धान्य बाजार, गांधी चौकातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर अमर जवान चौक, न्यायालयाजवळील विजय स्मारकावर तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या दरम्यान, सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते अमर जवान चौक, तहसिलदार कचेरी येथे प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये एनसीसी कॅडेट वाघीरे विद्यालय वाघीरे कॉलेज व पुरंदर हायस्कूल हे सहभागी झाले होते. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, शेखर वढणे, अभिजीत जगताप, हरिभाऊ लोळे, माजी सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव कुंभारकर, धनंजय जगताप, किरण पुरंदरे, चंद्रकांत कुंभारकर ,सतीश खेनट ,रमेश शिंदे, राजेंद्र भोंगळे, नितीन राऊत, मोहन शिंदे, भाग्यवान मस्के, हमीद शेख यासह माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदरचे सर्व सभासद आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments