वीर या ठिकाणी युवकाला बेदम मारहाण; करून गुडघ्यावर बसवून माफी मागण्यास सांगितली सासवड प्रतिनिधी: वीर (ता. पुरंदर )येथील सौरभ सुरेश वाघ (वय- 32 वर्ष) यांचा हॉटेल व्यवसाय असून, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास वीर या ठिकाणच्या गावच्या हद्दीमध्ये समृद्धी बियर बार हॉटेलमध्ये चायनीज किचन या ठिकाणी स्वत: सौरभ असताना त्या ठिकाणी दिलीप विलास धुमाळ यांनी अमोल आप्पासो धुमाळ यांना बियरचे बिल जास्त लावल्याच्या कारणावरून, चिडून जातीवाचक शब्द , शिवीगाळ करुन, त्या ठिकाणी दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासो धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापसिंह धुमाळ, शंभूराज महादेव धुमाळ या सर्वांनी जमाव, जमवून, शिवीगाळ, दमदाटी करीत, हाताने, लाथाने, काठीने व कुंभारी विटेने सौरभ सुरेश वाघ यांना वीर येथे गुरुवारी रात्रीच्या नऊच्या सुमारास मारहाण केली व गुडघ्यावर बसून माफी मागण्यास या सहा जणांनी परावृत केले. त्यामुळे सौरभ यांनी त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन मध्ये कायदेशीर पद्धतीने, फिर्याद दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (1), 189 (1), 189 (2 ),190, 191(1),191(2), 191 (3),115 (2 ),352, 351 (2 ),(3 )या यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, याची नोंद पोलीस हवालदार बी. यु. थोरवे यांनी केली, तर सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार पी. एल. जाधव करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments