वाघीरे महाविद्यालयात मा. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन सासवड प्रतिनिधी: १. कारगिल दिनप्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना विभागाने महाविद्यालयात कारगिल विजय दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार भोसले उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना कारगिलच्या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल दिन विजय दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे या उद्देशाने उपस्थित राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, प्रा. सुनील शिंदे, प्रा. जाधव आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स या कार्यक्रमास उपस्थित होते.२. ग्रंथ प्रदर्शन : ग्रंथालय विभाग आणि युनिक पब्लिकेशन यांच्या सहकार्याने ग्रंथपाल डॉ. तुषार दिलपाक यांच्या संकल्पनेतून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना डॉ. झगडे यांनी ग्रंथ प्रदर्शन म्हणजे केवळ पुस्तकांचा बाजार नसून, ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून ज्ञान, विचार, अभिव्यक्ती आणि संवाद यांचं एक खुलं व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. समाज वैचारिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी अशा प्रदर्शनांना खूप महत्त्व आहे. महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करणे आजच्या पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, याप्रसंगी कार्यालयाधिक्षक अशोक कोंढावळे, रवी जाधव, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.३. पिस्टल शूटिंग जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. प्रितम ओव्हाळ यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना पिस्टल शूटिंगचे महत्त्व अधोरेखित केले. पिस्टल शूटिंग या खेळामुळे मानसिक संतुलनासाठी आवश्यक असणारी एकाग्रता, श्वासावर नियंत्रण आणि नियमित तयारी यास्पर्धेतून साध्य करण्यात येते. अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना विभागात करण्यात आले होते . या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेGIS कार्यशाळा आयोजितभूगोल विभागांतर्गत "भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक GIS तंत्रज्ञानाची ओळख व उपयुक्तता याबाबत जागरूकता व नोकरीच्या संधी या उद्देशाने करण्यात आली होती. याप्रसंगी GIS तज्ञ प्रा. डॉ. गणेश काशिनाथ मधे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना GIS म्हणजे काय, त्याचा उपयोग, प्रकार, तसेच शैक्षणिक व रोजगाराच्या दृष्टीने GIS मधील करिअर संधी यावर सविस्तर माहिती दिली.कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सॉफ्टवेअर डेमो, नकाशा तयार करणे, डेटा विश्लेषण अशा विविध बाबींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार घोरपडे, कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोडरे, प्रा. प्रतिक्षा पोमण, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे, प्रा. करिश्मा बरकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुजा सावंत या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिक्षा पोमण यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. स्वाती भोसले यांनी मानले. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात अशा आणखी तांत्रिक कार्यशाळांचे आयोजन व्हावे अशी मागणी ही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments