Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्रावण महिन्यामध्ये वीरेश्वर मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठित स्थापना सासवड प्रतिनिधी: श्रावण महिन्यातील मासारभाचे अवचित्य साधून, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथील वीरेश्वर मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठित स्थापना व लघु रुद्र अभिषेक करण्यात आला. मंदिराची साफसफाई, स्वच्छता, फुलाची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. होम व लघु रुद्राभिषेक, सर्व विधी झाल्यावर, भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्राम पुरोहितांच्या हस्ते मंदिरातील विधी, होम हवन करण्यात आले. मंदिराला आकर्षित विद्युत रोषणाई, करण्यात आली होती. ती मिथुन धुमाळ वीर येथील यांनी केली होती, तसेच श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामस्थ राजेंद्र लक्ष्मण धुमाळ यांनी मुख्य शिवलिंग वजॅरलेपाचा खर्च केला. महाप्रसादासाठी विठ्ठल धुमाळ यांनी पुढाकार घेतला, भाविकांच्या सहभागातून प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट कार्यरत असल्याचे, यावेळी सांगण्यात आले प्रभू श्रीराम वनवासात जात असताना, या मंदिराची स्थापना करण्यात आल्याची आख्यायिकाता सांगण्यात आली. पूर्वाभिमुख शिवलिंग असलेली वीरेश्वर हे एकमेव मंदिर असून, शिवलिंग अतिशय प्राचीन असल्याने, शंभू महादेवाच्या पिंडाला सर्व विधी विधानच्या चौकटीत राहून वज्रलेप करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रिया व व्यवस्थापन कामी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ, सुनील धुमाळ, विराज धुमाळ, सचिव काशिनाथ धुमाळ, खजिनदार अमोल धो. धुमाळ, विश्वस्त श्रीकांत थिटे, बाळासो समगीर, प्रमिला देशमुख, अलका जाधव, जयवंत सोनवणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments